Posts

Showing posts from February, 2018

अंधश्रद्धा आणि समाज

Image
                अंधश्रद्धा आणि समाज                       जग कुठे चालले आहे आणि आपण कुठे. आपण  आणि आपला समाज अंधश्रद्धेच्या गर्तेत अजूनच अडकत चालला आहे.आपल्या समाजात अशा कितीतरी अंधश्रद्धा आहेत ज्या आपण त्याला श्रद्धेचा लेप देऊन चालवत असतो. सांभाळत असतो. उदाहरणच द्यायचे झाले तर नागपंचमीचे देता येईल. नागपंचमीला नागाची पूजा करतात. महिला त्याला अगदी प्रेमाने,श्रद्धेने  दुध पाजताना दिसतात. पण हेच दुध नागाला विषासमान  आहे.कारण या दुधामुळे नागाच्या पचनसंस्थेमध्ये बिघाड होऊन नागाचा यात मृत्यूही होऊ शकतो. हे खूप वेळा वर्तमानपत्र आणि आकाशवाणीवरून सांगितले जाते पण कोणी ऐकायलाच तयार नसते.रूढी परंपरेच्या नावाखाली हे सुरूच राहते.                     नाग गारुडी पुंगी वाजवेल तसा त्या सुरावर डोलतो, एखाद्यावर लक्ष्य ठेऊन बदला घेतो असे म्हणतात.पण खरेतर नागाला ऐकूच येत नाही.ती पुंगी जशी हलते तसा तो डोलत असतो.या सर्व अंधश्रद्धा समाजात आ...