स्त्री शक्तीला सलाम

                                                स्त्री शक्तीला सलाम 








                   भारतीय तत्वानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभूत सुविधा व समृद्धी देणारी लक्ष्मी व संरक्षण देणारी महाकाली दुर्गा या त्रिकोणाच्या शिरोबिंदुमध्ये ज्ञान कल्पना देणारा महा सरस्वती असते. अशा प्रकारे या तीन शक्तींना महाकाली , महालक्ष्मी, महासरस्वती असे स्थान आहे दिलेले आहे. पूजा जरी पुरुष देवताची होत असली तरी चर्चा होते ती त्यांच्या शक्तीची, त्यांच्यात असलेल्या स्त्री शक्तीची.
             स्त्री आणि पुरुष यांच्यात केवळ शरीर भेद नाही तर स्त्री अधिक संवेदनशील श्रद्धावंत आहे. तिला देवत्वाचे अस्तित्व अधिक जाणवते.पुरुषांचे लक्ष्य मात्र भौतीकातेकडे जडत्वावर अधिकार गाजविण्याकडे अधिक असते.
             राजा जनकाच्या राज्यसभेत यज्ञवलक्याला कसे प्रश्न विचारण्यात आले होते ते आपणास आठवते का ? त्यांना प्रश्न विचारणाऱ्यापैकी प्रमुख होती वाचवनवी नामक एक कुमारी मोठी वाक्पटू होती.त्या काळी अशा स्त्रियांना ब्रम्हा वादिनी म्हणत. एखाद्या कुशल धनुर्धनाच्या हातात चाम्कावणारे दोन बन असावेत असे माझे प्रश्न आहेत असे ती म्हणाली. त्या ठिकाणी तिच्या स्त्रीत्वासंबंधी कोणताही प्रश्न उपस्थित केलेला नाही.
                 तसं  पाहता समाजातील स्वतःचे न्यायस्थान जगभरात कुठेही भारतातील महिलांना पुरुषाप्रमाणे उक्ते मिळाले नाही. गेल्या दशकात त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षाच्या आणि त्यातून महिलांनी साधलेली प्रगतीचा  प्रवास १९५० मध्ये प्रेम माथुर यांना भारतातील पहिल्या व्यावसायिक महिला वैमानिक होण्याचा मान, १९५२ च्या ऑलिम्पिक स्पर्धामध्ये पुरुष व महिलांना एकत्रित खेळण्याची संधी भारत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी , सुचेता कृपलानी यांना भारतातील पाहिल्या मुख्यमंत्री होण्याचा मान, भारतीय पोलीस सेवेत अधिकारी पदावर किरण बेदी यांची निवड, पोलीस सेवेत अधिकारी पदावर दाखल झालेल्या पहिला महिला मदर तेरेसा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. भारतीय महिलांचा सैन्य दलात प्रवेश .भारताच्या राष्ट्रपती पदी महिलेची निवड प्रतिभाताई पाटील, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भारतरत्न किताब,. भारतात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना ५०% आरक्षण आहे.
                 अशा प्रकारे या आरक्षणाचा फायदा तर त्या महिअला घेतातच आणि त्यांच्यातील कालागुनानंमुळे त्या आज वेगवेगळ्या पदावर कार्यरत असल्याचे दिसतात. याशिवाय जग बदलते आहे तशी स्त्री सुद्धा आपल्या कौशल्यात सुधारणा करून आज पुरुषांच्या बरोबरीनेर येण्याचा प्रयत्न करताना दिसते. 

Comments

Popular posts from this blog

पर्यावरण आणि मानवी जीवन

लोकसंख्या, पर्यावरण आणि विकास

अंधश्रद्धा आणि समाज